Saturday 20 June 2015

वर्तमानपत्रांचे समाजातील स्थान.

                  वर्तमानपत्रांचे समाजातील स्थान.

            आज एकविसाव्या शतकात वर्तमानपत्रे ही समाजाचा आरसा आहेत. त्याचबरोबर वर्तमानपत्रे ही आजची अनिवार्य गरज झाली आहे. विचारवंतांना  वाटत होते, दूरचित्रवाणीच्या या युगात वर्तमानपत्राचे महत्त्व कमी होईल. पण आता दूरचित्रवाणी येऊन पस्तीस वर्षे होऊन गेली तरी वर्तमानपत्रांचे महत्त्व कमी झाले नाही, उलट वाढेलच आहे. वर्तमानपत्रांचे वाचक पूर्वीपेक्षा अनेक पटींनी वाढले आहेत. आणखी एक विशेष असा की, ’मूर्ती लहान पण कीर्ती महान’ अशा या वृत्तपत्रांचा समाजाच्या सर्व स्तरांत  सारखाच संचार असतो. महाल, प्रासाद आणि आजकाल मोठमोठ्या प्लॅटमध्ये राहणाऱ्या श्रमिकालाही वर्तमानपत्र हवे असते. प्रत्येकाचे हेतू, उद्दीष्ट वेगवेगळे असेल, पण वर्तमानपत्राची वाट सर्वजण तेवढ्याच उत्कट्तेने पाहत असतात.  
            आपल्या देशात एकोणिसाव्या शतकात वृत्तपत्रांचा जन्म झाला. मुद्र्णकलेच्या शोधनंतर त्याला खरे बाळ्से आले. पण जन्मापासूनच त्याची नाडी समाजाशी जुळलेली. मराठीतील पहिल्या वर्तमानपत्राचे नाव होते- दर्पण. खरोखर वृत्तपत्र हा समाजाचा ’दर्पण’च असतो. वृत्तपत्रांची महत्त्वाची कामगिरी दिसून येते ती ’समाजप्रबोधना’ची . समाजातील ज्या ज्या विचारवंताला, समाजसेवकाला, राजकीय धुरिणाला लोक जागृती करावीशी वाटली, त्याने ’वर्तमानपत्रा’चाच आधार घेतला.
            लोकमान्य टिळकांच्या ’केसरी’, ’मराठा’ यांनी निद्रिस्त समाजाला जागे करून उन्मत्त ब्रिटिश सरकारला सवाल केला- ’सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? इष्ट वाटेल ते करणार आणि वाटॆल ते लिहिणार, ही प्रतिज्ञा करुन आगरकरांनी ’सुधारका’त समाजातील मूर्ख रुढींवर हल्ला चढविला. शिवरामपंत परांजपे यांचा ’काळ’, अच्युतराव कोल्हटकरांचा ’संदेश’ यांनी समाजाला सतत धगधगते ठेवले. ह. ना. आपटे यांचा ’करमणूक’ समाजाची करमणूक करताना  समाजाच्या डोळ्यांत अजंन घालत होता. ’हरिजन, मधून गांधीजी समाजाला सतत उत्तेजित करत होते, समाजाच्या दोषांवर बोट ठेवत होते. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या काळात आचार्य अत्रे यांच्या ’मराठा’ने समाजाला सतत जागृत ठेवले.
            आज वर्तमानत्रांतून विविधता आढळते. वेगवेगळ्या भाषांतून वेगवेगळ्या ठिकाणी प्रसिद्ध होणारी वृत्तपत्रे समाजाचे मनोगत व्यक्त करत असतात. ’वार्ता’, ’बातमी’ देणे हे वर्तमानपत्राचे काम असले तरी याहून अनेक मार्गांनी वृत्तपत्र समाजाला घडवत असते. घडणाऱ्या घडनांवरील टिप्पणी, स्फुटलेखन, अग्रलेख इत्यादींतून समाजाची विचारधारा घुसळ्ली जाते. त्याचबरोबर येणारे चित्रपट, नाटके, नवी पुस्तके यांतून बदलणाऱ्या, तसेच, नव्या विचारप्रणाली वृत्तपत्रे समाजापर्यंत पोहचवितात. ’जाहिरात’ ही आजच्या वृत्तपत्राची आणि समाजाची आत्यंतिक गरज आहे. आज लोकशाहीत लोक, अगदी सर्वसामान्य माणूस आपले मनोगत वृत्तपत्रांतून व्यक्त करुन सरकारवर, म्हणजेच शासनावर अंकुश ठेवू शकतो. म्हणून वृत्तपत्रांचे समाजातील स्थान फार महत्त्वाचे आहे
.  
      पंधराव्या शतकात प्रिटिंग प्रेसचा शोध लागला. त्यानंतरच अर्थातच ज्ञानप्रसारात किंवा माहितीच्या क्षेत्रात एक नवीन युग अवतरल. हि गोष्ट फक्त पुस्तकांपुरती मर्यादीत राहिली नाही. तर १९०५ मध्ये पहिल वर्तमानपत्र लोकांसमोर आल. त्यानंतर मुद्रित माध्यमाचा हा प्रसार सर्व अंगांनी आजतागायत होतच राहिला आहे; पण विशेषत: वर्तमानपत्र ही युरोपमध्ये ४०० वर्षांपुर्वी सातत्यान वाढत गेला आहे. १९९० च्या सुमारास पाश्चिमात्य देशातील वर्तमानपत्रखपाला थोडेसे अडथळे निर्माण झाले, असं म्हणता येइल. अर्थात पाश्चिमात्य किंवा विकसित देशांमध्ये वर्तमानपत्रांचा खप लोकसंख्येच्या जवळ्पास ९० टक्क्यांच्या आसपास पोचलेला होता. पण याविरुद्ध आशिया, दक्षिण अमेरीका, आफ्रिका येथे जवळपास ७५ टक्क्यांपेक्षा जास्त राहते, तिथं मात्र आजही वर्तमानपत्र ही वाढत्या संख्येन दिसतात. 

3 comments: